Rajapur : सोलगाव येथुन बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला

राजापूर : तालुक्यातील सोलगाव येथुन नापता झालेले मुळचे विक्रोळी मुंबई येथील रहिवासी असलेले महिपत शिवराम कदम (६४) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यांचा मृतदेह सोलगाव येथील गगनगिरी महाराज यांचे मठा लगतच्या जंगलात आढळून आला आहे.

महिपत शिवराम कदम हे सोलगाव येथुन रविवार ४ जानेवारी पासून बेपत्ता झाले होते. बाबत राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुरूवार दि. ८ जानेवारी रोजी चार दिवसांनी सोलगाव गगनगिरी महाराज मठाजवळच्या जंगलमय भागात एका झाडाखाली वेलीने गळफास घेतल्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे. राजापूर पोलीसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस हेड काँस्टेबल ममता नामये अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 10/Jan/2026