Ratnagiri : कोतवडे येथील कुसुमेश्वर क्रीडा मंडळाच्या माघी गणेशोत्सवाला २२ जानेवारीपासून प्रारंभ

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील कुसुमेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने २२ ते २८ जानेवारीदरम्यान माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाचे हे ४४ वे वर्ष असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेश भक्तांसाठी कबड्डी स्पर्धा, नमन, सांस्कृतिक, नाट्य प्रयोग, सत्यनारायण महापूजा, गणेश याग, भजने, रात्री महाआरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ४३ वर्षे कुसुमेश्वर क्रीडा मंडळातील सर्व सभासद व गणेश भक्त मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करत आहेत.

२२ ते २८ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्रीं ची पूजा, अभिषेक आरती होणार असून, रात्री ८ वाजता महाआरती केली जाईल. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता “श्री”ची स्थापना व आरती, सायंकाळी ५.३० ते ७ यावेळेत कुसुमेश्वर क्रीडा मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. ७.३० वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा होतील. २३ रोजी सायंकाळी ५.३० ते ७ निखील पाटील आणि मंडळी यांचे भजन होईल. त्यानंतर ७.३० वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा होतील. २४ रोजी सायंकाळी ५ ते ७ मारुती बुवा मेस्त्री आणि मंडळी यांचे भजन, तर ७.३० वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा होतील. २५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ८ यावेळेत हभप सुधाकर परांजपे यांचे कीर्तन होईल. ८.३० ते १० यावेळेत आक्रेश्वर भजन मंडळाचा भजन बुवा अभिषेक मांडवकर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर १० वाजता श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे, गवळीवाडी (ता. संगमेश्वर) यांचे नमन सादर होईल.

मिलिंद वारेकर आणि परिवार यांच्या सौजन्याने २६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री गणेश याग होईल. दुपारी १२.३० वाजता. कै. कमलाकर मयेकर व कै. सचिन मयेकर यांच्या स्मरणार्थ प्रसाद वाटप होईल. सायंकाळी ४ व ६ यावेळेत प्रशांत पांचाळ बुवा आणि मंडळी यांचा, तर ६ ते रात्री ८ यावेळेत दीपक बारगोडे बुवा आणि मंडळी यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २७ रोजी सकाळी १० वाजता श्र सत्यनारायण महापूजा होईल. वंदना पेडणेकर यांच्या स्मरणार्थ जनार्दन पेडणेकर आणि परिवारातर्फे दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत विजय बुवा मयेकर यांचे भजन होईल. त्यानंतर रात्री १० वा. अनन्या एन्टरटेनमेंटचे (मुंबई) ‘भटाची बायपास’ हा २ अंकी नाट्यप्रयोग सादर केला जाईल. २८ रोजी दुपारी ४ वाजता ‘श्री’ ची भव्य मिरवणूक व विसर्जन होईल. उत्सव कालावधीत गणेशभक्तांनी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 10/Jan/2026