लांजा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना शाखा लांजा च्या वतीने शुक्रवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भांबेड बीट विस्तार अधिकारी विमल चव्हाण उपस्थित होत्या. पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने यावर्षी इयत्ता ५ वी स्कॉलरशिपच्या पहिल्या सराव परीक्षेचे दोन्ही विषयांचे पेपर्स दिले जाणार आहेत. त्याप्रमाणे मराठी माध्यम ६७१ विद्यार्थी आणि उर्दू माध्यमच्या २९ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका आणि OMR शीट्स गटशिक्षणाधिकारी सावंग यांजकडे सुपूर्द करण्यात आले.
पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी अहवालानुसार नवीन वेतन निश्चिती करून त्याचा लाभ संबंधित शिक्षकांना मिळवून देण्यासाठी संघटने मार्फत आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार महिनाभरात वेतननिश्चिती करून सेवापुस्तके पडताळणी साठी पाठविण्यात येतील याची जबाबदारी कार्यालयाने घेतली. याबरोबरच शिक्षकांच्या कामगिरी, बिलेओ नेमणूक, निपुण परीक्षा, शा. पो. आहार, पासबुक मधील रकमेच्या इंट्री, याविषयी चर्चा करण्यात आली.
या भेटीप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संजय डांगे, तालुकाध्यक्ष घाडी, सचिव भागवत कुंभार, कार्याध्यक्ष महादेव आयरे, रावले, वसंत शिंदे, श्रीकांत आयरे, श्री. सरदेसाई, शशिकांत बंडबे, संतोष तरळ, निखिल गोसावी आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 10/Jan/2026














