Dapoli : दारुच्या व्यसनापायी प्रौढाने गमावला जीव

दापोली : दारुच्या नशेत अंगावर ताडपत्री घेऊन आझाद मैदानात झोपलेल्या प्रौढाचा झोपतेच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सांयकाळी उघडकीला आली. समित शांताराम पवार (वय ४४, रा. ताडील – सुरेवाडी, दापोली) असे त्याचे नाव आहे.

याबाबत त्याच्या भावाने दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, समित याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत दापोली एसटी स्टॅण्ड व परिसरात फिरुन दुकानदारांकडे पैसे मागून काहीतरी खाऊन एसटी स्टॅण्ड परिसरात राहत होता. तो दारुच्या नशेत आझाद मैदानात अंगावर ताडपत्री घेऊन झोपलेल्या स्थितीत मृतावस्थेत सापडला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 10/Jan/2026