रत्नागिरी: मोकाट गायीने उडवली उकळत्या तेलाची कढई; दोघे जण भाजले

रत्नागिरी : शहरातील रामआळी येथील हॉट चिप्स दुकानातील तेलाच्या कढईला मोकाट गायीची धडक लागल्याने उकळते तेल अंगावर पडून दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सिद्धेश प्रकाश दळवी (२६, रा. कोळंबे, रत्नागिरी) व दीपक सुरेश कोलापटे (२६, रा. झारणीरोड, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सिद्धेश व दीपक हे दोघे गुरुवारी सायंकाळी रामआळी येथील हॉट चिप्स दुकानाबाहेर उभे होते. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास एक मोकाट गाय दुकानासमोरून जात असताना तिचा धक्का दुकानातील तेलाच्या कढईला लागला. या वेळी उकळत्या कढईतील तेल सांडल्याने सिद्धेश व दीपक हे भाजून जखमी झाले. या वेळी तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 10-01-2026