रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास उघडकीस आली. समीर अशोक पवार (३२, रा. खेडशी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या आत्येभावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत समीर आपल्या खोलीबाहेर न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता त्यांना समीर खोलीतील फॅनला चादरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. नातेवाईकांनी याबाबत तातडीने ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 10/Jan/2026














