माखजन : अनेक ठिकाणी पत्त्याचा पुरावा देण्यासाठी ग्राहक महावितरणची विद्युत बिले देतात. पण संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील विद्युत बिलांवर चुकीचा पिनकोड टाकण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल वापरण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. आंबव पोंक्षे गावचा पिन कोड ४१५६०८ असा आहे. त्याऐवजी महावितरणकडून ४१५८०४ असा छापण्यात आला आहे.
४१५८०४ हा पीन कोड संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली, मार्लेश्वर, तुळसणी आदी भागासाठी आहे. महावितरणकडून चुकीचा पिनकोड विद्युत बिलावर येत असल्याने ग्राहकांना पत्त्याचा पुरावा म्हणून बिलाची नक्कल विविध कामासाठी कागद पत्रांसोबत जोडताना अडचणी येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 24/Sep/2024