रत्नागिरी : पाली परिसरात १५ दिवस विलंबाने गॅस पुरवठा, ऐन दिवाळीत लाडक्या बहिणींची गैरसोय

पाली : पाली सारख्या ग्रामीण भागातील महिला व गॅस ग्राहक आता ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही घरगुती गॅस सिलेंडरचा नोंदणी करूनही १५ होऊनही मिळत नसल्याने लाडक्या बहिणी आता चांगल्याच त्रस्थ झालेल्या आहेत.

गेले तीन महिने या परिसरात याचप्रकारे विलंबाने गॅस सिलेंडर वितरण होत असूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ग्राहकांनी रिफील गॅस सिलेंडर बुक करूनही १५ दिवस होऊनही पुरवठा सुरळीत होत नाही आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात मोठी अडचण होत आहे. त्याच शिवाय साठरे बांबर,वळके,पाथरट,खानू,कशेळी, सरफरेवाडी, कापडगाव, नागलेवाडी,निवसर या भागात अद्यापही सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने या गावातील ग्राहकांना नेटवर्क अभावी ओटीपी प्राप्त होत नाही अशावेळी हे ग्राहक नेटवर्कमध्ये येऊन गॅस बुकिंग करतात त्यावेळी पेट्रोलियम कंपन्यांच्या सर्व्हरला तांत्रिक बिघाड असल्याने अनेकदा ओटीपी प्राप्त होत नाही अशा दुहेरी कात्रीत ग्राहक सापडलेले असून त्यांना त्यामुळे सिलेंडर मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे शासनाने व लोकप्रतिनिधींनी किमान काही महिने तरी संगमेश्वर तालुक्यात ज्याप्रमाणे ग्रामीण भागातील ग्राहकाला ओटीपी शिवाय सिलेंडर द्यावेत अशा सुचना सचिवालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवरच पाली परिसरातील ओटीपीची अट किमान आता ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात तरी काही दिवस स्थगित करुन या भागात १५ दिवस विलंबाने होणारे गॅस वितरण तातडीने पूर्ववत करण्याची मागणी लाडक्या बहिणीकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 28/Oct/2024