देवरूख : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भरारी पथके कार्यरत आहेत.
देवरूखातही भरारी पथके कार्यरत असून भरारी पथकामार्फत वाहनांची कसून तपासणी होतेय. भरारी पथकांमध्ये शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची नेमणूक मार्लेश्वर तिठ्यावर वाहनांची तपासणी करत असताना भरारी पथकाने इनोव्हा गाडीची तपासणी केली असता गाडीत ऑनलाईन बेटिंग अॅपचे कॉईन, टेबल, लोखंडी स्टॅन्ड, मशिन अशा जुगाराशी निगडीत वस्तू आढळल्या.
भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ देवरूख पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी संपर्क साधला; पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत कारवाई करत गाडीसह सर्व मुद्देमाल केला जप्त देवरूख पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भरारी पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतेय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 28/Oct/2024














