Ratnagiri : विषारी औषध घेतलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे अज्ञात कारणातून २३ डिसेंबर २०२५ रोजी विषारी औषध सेवन केलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश हिरु आग्रे (६०, रा. करबुडे, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. प्रकाश आग्रे यांनी २३ डिसेंबर रोजी विषारी औषध घेतले होते. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 12/Jan/2026