चिपळूण : शहरातील रस्ते रूंदीकरण, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आदी विषयांसह व्यापाऱ्यांना असलेल्या अडचणींसंदर्भात चिपळूण नगर परिषदेने सोमवारी (दि. १२) सायंकाळी ५ वा. व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक पाग येथील पाण्याची जुनी टाकी असलेल्या न.प.च्या श्रीकृष्ण सभागृहात होणार आहे. न.प. लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्यांचा कारभार सुरू झाल्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अनेक वर्षे असलेल्या विविध समस्या सोडविण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार शहरात गेल्या काही वर्षांपासून प्रशासन व लोकप्रतिनिधींसमोर डोकेदुखी ठरलेला अतिक्रमणांचा विषय. प्रामुख्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून दुकानातील वस्तू रस्त्याकडेला ठेवून केलेले अतिक्रमण, फेरीवाल्यांचे अतिक्रमणे. परिणामी, वाहतूक कोंडी व रस्ता रुंदीकरण करण्यात येणारे अडथळे अशा सर्वच विषयांवर नगराध्यक्ष सकपाळ यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यात प्रामुख्याने रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण या विषयावर प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर असल्याने व्यापाऱ्यांनी सहकार्य करुन वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे व रस्ता रुंदीकरणाबाबत या बैठकीतून योग्य तोडगा काढला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 12/Jan/2026














