मेष – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख – समाधान मिळेल.
प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज – मस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.
वृषभ – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा – गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज – मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल.
मिथुन -12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद – विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ व प्रवास शक्यतो टाळा.
कर्क – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. वेळेवर जेवण मिळणार नाही. निद्रानाश होईल. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे.
सिंह – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी – पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.
कन्या – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात – निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.
तूळ – सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज – मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.
वृश्चिक – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही.
धनु – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल.
मकर – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील.
कुंभ – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज – मजेसाठी जास्त खर्च कराल. एखादा प्रवास संभवतो. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील.
मीन – 12 जानेवारी, 2026 सोमवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्यांची जुनी येणी वसूल होतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 12-01-2026














