रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार, ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा. कोकणनगर ते मारुतीमंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील चर्मालय येथे घडली होती. ज्ञानेश्वर कचरु गिरे (३९, रा. आंबा पन्हळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी ज्ञानेश्वर गिरे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-०८-डब्ल्यू-८७७८) मध्ये एच. पी. सिलेंडर भरुन भरधाव वेगाने परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्याने जात होता. तो चर्मालय येथील चार रस्त्यांवर आला असता त्याने बुधाजी सिताराम पवार (६२, रा. कोकणनगर औदुंबर चौक, रत्नागिरी) यांच्या प्लेझर दुचाकी (एमएच-०८-यु-५८६३) ला धडक देत अपघात केला. यात पवार यांच्या पायाला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातप्रकरणी शनिवार, १० जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 12/Jan/2026














