लांजा : उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय लांजा व जिल्हा अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे लांजा शहर समन्वय समितीने केलेल्या तक्रार निवारण दिनासाठीच्या मागणीला यश आले आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी १७ जानेवारी रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय लांजा येथील सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.
उप अधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय लांजा व जिल्हा अधीक्षक रत्नागिरी यांचेशी चर्चा करुन भूमी अभिलेख जिल्हा व तालुका कार्यालय अधिकारी व लांजा शहर समन्वय समिती लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण दिननाचे आयोजन करण्यात आले. यासाठी लांजा शहर समन्वय समितीने जिल्हा भूमी अभिलेखकडे पाठपुरावा केला होता.
या तक्रार दिनाप्रसंगी डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्जाची छाननी व त्यावरील समर्पक निवारण न झालेल्या नागरिकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून तक्रारींची नोंद करुन क्रमवार तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. तरी लांजा शहरासह लांजा तालुक्यातील पूर्वीच्या सादर केलेल्या तक्रारींचा पुरावा सोबत घेऊन उपस्थित राहावे. तक्रार निवारण करण्याचा हा एक सुलभ प्रयत्न असून, लाभार्थ्यांनी याचा तक्रार निवारण दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लांजा शहर समन्वय समीतीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 12/Jan/2026














