Mandangad : रमाबाई जयंतीच्या पार्श्वभूमीवर मायनिंगची वाहतूक बंद ठेवावी; रिपाई आठवले गटाचे तहसीलदारांना निवेदन

मंडणगड : माता रमाबाई आंबेडकर यांचे जंयत्तीचे पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध मार्गावर सुरु असणारी मायनींग वाहतूक ६ व ७ फेब्रुवारी २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवावी या मागणीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया शाखा (आठवले गट) मंडणगड यांच्यावतीने तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनानुसार, रिपाइं आठवले गट यांच्यावतीने दापोली फाटा भिंगळोली येथे ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माता रमाबाई आंबडेकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादानासाठी दापोली येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा, नाष्टा, जेवण तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहेत. गेली चार वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. यावर्षीही उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यात मायनींग वाहतूक दोन दिवस बंद ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक आदेश मर्चडे, तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, संदेश खैरे, विजय खैरे, किरण पवार, सुरेश तांबे, संकेत तांबे, गौरव मर्चेंडे, राजन साळवी, विधान पवार यांची स्वाक्षरी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 12/Jan/2026