Chiplun : कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा; वृद्धाविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : चिपळूण शहरात जुगार खेळविताना एका वृद्ध व्यक्तीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई ९ जानेवारीला गोवळकोट कमान ते एन्रॉन ब्रिज रोडवरील इकरा पार्क समोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. आरोपी मुनवरमिया राजुमिया जमादार (७१, रा. फिश मार्केट, आलोरे, ता. चिपळूण) हा कल्याण मटका या जुगार प्रकारावर शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळवित असल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ६६५ रुपये किमतीचा माल जप्त केला असून, त्यामध्ये ६६० रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य यांचा समावेश आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल उल्हास जोगी यांनी दिली. या कारवाईबद्दल चिपळूण पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 12/Jan/2026