पावस येथे मंडल कार्यालयाअंतर्गत आंबा लागवडीची पाहणी

पावस : मंडल पावस कार्यालयाअंतर्गत गावामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख यांचा विविध ठिकाणी दौरा आणि तपासणी कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावेळी शेतकरी दिनेश थूल, मावळंगे यांच्या प्रक्षेत्रावर नर्सरी तपासणीसह आंबा लागवडीची पाहणी केली.

यावेळी शेख यांनी सेंद्रीय शेती प्रशिक्षण, लागवड ते निर्यात करणे, केशर आंबा तसेच कीड रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले, पॅक हाऊस तसेच विविध योजनांची माहिती देऊन अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. त्यानंतर गोळप येथे पारस नर्सरी पाहणी केली. सोबत कृषी अधिकारी एस एन नडगिरी, कोकणी, ज्ञानेश्वर राऊत आदी शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 12/Jan/2026