MERC सार्वजनिक सुनावणीत रत्नागिरीच्या Hindustan Solar कडून ठाम भूमिका

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील वीज दर व नियामक धोरणांबाबत दाखल करण्यात आलेल्या MYT याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) यांच्या वतीने पुणे येथे आयोजित सार्वजनिक सुनावणीत रत्नागिरीस्थित Hindustan Solar चे संस्थापक वसीम रझिया अझिज नाईक यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सौर उद्योग, व्यावसायिक-औद्योगिक ग्राहक तसेच कोकण प्रदेशाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले.

या सुनावणीत त्यांनी Grid Support Charges तसेच 10 kW वरील ग्राहकांसाठी TOD (Time of Day) लागू करण्यास तीव्र विरोध दर्शविला. *वीज वितरणासाठी वापरण्यात येणारी Grid ही ग्राहकांच्या पैशातून उभारलेली सार्वजनिक मालमत्ता असून, तिचा मालक प्रत्यक्षात ग्राहकच आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांकडून Grid Support Charges आकारणे अन्यायकारक, दुहेरी वसुली करणारे व ग्राहकविरोधी आहे. त्यामुळे हे शुल्क पूर्णतः रद्द करण्यात यावे, अशी स्पष्ट व ठाम मागणी त्यांनी आयोगाकडे केली.

तसेच विद्यमान सौर ग्राहकांनी बँक कर्ज व मोठी गुंतवणूक करून प्रकल्प उभारले असून, अशा परिस्थितीत सौर ऊर्जेचा लाभ 17 तासांवरून केवळ 8 तासांपर्यंत मर्यादित करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, ₹11,751 कोटींच्या प्रस्तावित वसुलीबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, ही रक्कम वीज वितरण कंपनीच्या पूर्वीच्या करार, प्रशासकीय चुका व न्यायालयीन बाबींशी संबंधित आहे. ही वसुली TOD विषयासोबत मिसळू नये, तर या विषयासाठी स्वतंत्र सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी MERC कडे केली. एकमेकांशी असंबंधित विषय एकत्र मांडल्यास ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकण हा पर्यटनप्रधान प्रदेश असूनही हॉटेल उद्योगाला अद्याप व्यावसायिक (Commercial) वर्गात ठेवण्यात आले आहे, हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव वीज दरांमुळे पर्यटन व्यवसायाचा विकास होण्याऐवजी पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसत असून (tourism business will be hampered instead of development) स्थानिक रोजगार, छोटे उद्योजक व सेवा क्षेत्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगाला Industrial / Tourism tariff लागू करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनासोबतच मत्स्य व्यवसाय, बर्फ कारखाने, कोल्ड स्टोरेज व मासे प्रक्रिया उद्योग हे पूर्णतः वीजेवर अवलंबून आहेत. वीज दरवाढीचा थेट परिणाम या उद्योगांवर होत असून, त्याचा परिणाम संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

रत्नागिरीतील Hindustan Solar ही संस्था सौर ऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असून, ग्राहकहित, स्थानिक उद्योगांचे संरक्षण व दीर्घकालीन शाश्वत ऊर्जा धोरण याबाबत सातत्याने भूमिका मांडत आहे. सार्वजनिक सुनावणीत सक्रिय सहभाग घेऊन नियामक प्रक्रियेत योगदान देणे हे लोकशाही व पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:28 PM 12/Jan/2026