Ratnagiri News : दागिन्यांसाठी तरुणीला ब्रिजवरून ढकलून पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दापोली : सोन्या-चांदीचे दागिने व दोन मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने महिलेस बेसावध असताना जीवे ठार मारण्याकरीता भातगाव ब्रिजवरून पाण्यात ढकलून देवुन तिची अॅक्टीवा गाडी घेवून पळून गेलेल्या आरोपीस संगमेश्वर पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सपना संदीप डिंगणकर हिला नितीन गणपत जोशी (वय २७ वर्षे, मुळ रा. मधलीवाडी, पाचेरीसडा, ता. गुहागर, जि. २ रत्नागिरी सद्या रा. रुम नं. २०३, सिध्दीविनायक बिल्डींग, चंदननाका, प्रगतीनगर, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर) हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. दिनांक २१/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी हिस नितीन याने मुळ गावी काम असल्याचे तेथे जायचे आहे असे सांगितल्याने सपना यांनी आपलेकडील सोन्या चांदीचे दागिने, वापरते दोन मोबाईल व तिच्या भावाने तिच्याकडे ठेवलेली अॅक्टीवा गाडी असे सोबत घेवून आरोपीसह नालासोपारा येथुन दिनांक २१/१०/२०२४ रोजी २०.०० वा. चे सुमारास ट्रॅव्हल्सने निघाले ते दि. २२/१०/२०२४ रोजी ०६.०० वा. चे सुमारास गुहागर परिसरात आले. तेथे नितीन याने सपना यांची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तो त्याचे घरी निघुन गेला.

त्यानंतर दि. २२/१०/२०२४ रोजी १७.०० वा. चे सुमारास आरोपी याने त्या हॉटेलवर जावून फिर्यादी यांना आरोपी याचा मित्र भातगाव ब्रीज येथे भेटायला येणार आहे असे सांगून आपण त्याला भेटुन नालासोपारा येथे परत जाऊ असे सांगितले. त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांना अॅक्टीव्हा गाडीने भातगाव ब्रीज येथे घेवुन गेला. तेथे २०.०० वा. चे सुमारास आरोपी याने फिर्यादी या बेसावध असताना त्यांना दोन्ही हाताने उचलुन ठार मारण्याच्या उद्देशाने भातगाव पुलाच्या कठड्यावरुन खाली पाण्यामध्ये टाकले व फिर्यादी यांचे सोने, चांदीचे दागिने असलेली पर्स, मोबाईल व अॅक्टीवा मोटारसायकलसह चोरुन घेवुन निघून गेला. म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाणे गु. रजि. नं. ८५/२०२४, भा.न्या.सं.२०२३ कलम १०९ (१). ३०९ (६) प्रमाणे दिनांक २३/१०/२०२४ रोजी दाखल करणेत आलेला आहे.

सदरचा गुन्हा हा महिलाविषयक गंभीर असल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/श्री. यादव यांनी पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१२७३ मनवल, पोकॉ/१३५६ मस्कर यांचे तपास पथक आरोपीचे शोधास रवाना केले. आरोपी नितीन गणपत जोशी याचा तुळीज, नालासोपारा जि. पालघर याचा शोध घेत असताना तुळीज पोलीस ठाणे, नालासोपारा येथे सापळा रचून आरोपी यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने फिर्यादी यांचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल व अॅक्टीवा गाडी चोरल्याचे कबुली दिली. म्हणून त्यास गुन्हयाचेकामी दिनांक २६/१०/२०२४ रोजी तपासिक नागरगोजे यांनी अटक करून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी याचे ताब्यातून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने, वापरते दोन मोबाईल व अॅक्टीवा गाडी असा एकूण ४,५६,०००/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 28/Oct/2024