Lanja : बेनीखुर्द-खेरवसे उपसरपंचपदी मोहन धनावडे यांची बिनबिरोध निवड

लांजा : लांजा तालुक्यातील बेनीखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मोहन अप्पा धनावडे यांची नुकतीच बिनबिरोध निवड झाली. बेनीखुर्द येथील ग्रामपंचायत कार्यलयात पार पडलेल्या एका सभेत ही निवड करण्यात आली. मोहन आप्पा धनावडे हे लांजा तालुक्यातील समाजिक कार्यकर्ते असून बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचातीवर सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आले आहेत. यासह ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून सलग दोन वेळा उत्तमरीत्या कार्यभार सांभाळला आहे.

गाव परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता व ग्रामप्राशनाची जाण असल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. मोहन धनावडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच बेनिखुर्द-खेरवसे गावांच्या वतीने व माजी सदस्य, सरपंच यांच्यासह विद्यमान सदस्यांनी व नागरिकांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 12/Jan/2026