रत्नागिरी ः प्रतिनिधी तालुक्यातील करबुडे येथे अज्ञात कारणातून 23 डिसेंबर 2025 रोजी उंदीर मारण्याचे पोकायबा नावाचे औषध सेवन केलेल्या वृध्दाचा उपचारांदरम्या कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवार 10 जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश हिरु आग्रे (60,रा.करबुडे,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. प्रकाश आग्रे यांनी 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. अज्ञात कारणातून राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना रात्री 11.50 वा.त्यांचा मृत्यू झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 13-01-2026














