गुहागर : समुद्रचौपाटीला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त झाल्यानंतर अंतिममानांकनासाठी कराव्या लागणाऱ्या विविध सुविधांची पहाणी करण्यासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक प्रज्ञा मनोहर, पर्यटन विभागा डेप्युटी इंजिनिअर ऋषीकेश मारकर यांनी गुहागर बीचला भेट दिली. यामुळे ब्ल्यू फ्लग मानांकनासाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
गुहागर बीचला ब्ल्यू फ्लग पायलट दर्जा प्राप्त झाला आहे. मार्च अखेरपर्यंत मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ३३ सोयी सुविधांची पुर्तता करावी लागणार आहे. यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. गुहागरचे तहसिलदार परिक्षीत पाटील, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी पर्यटन उपसंचालक प्रज्ञा मनोहर व डेप्युटी इंजिनिअर ऋषीकेश मारकर यांना समुद्रचौपाटीवरील शासकीय जागा तसेच प्रत्येक विभागाची असलेली जागा दाखवीली. अतिशय बारकाईने पोलिस परेड मैदानाच्या मागील बाजुच्या चौपाटीची पहाणी करण्यात आली. या चौपाटीवर सुरूबनामध्येच कोकणी खादयाचे विविध स्टाल कसे उभारता येतील. वॉकींग ट्रक व त्यावर पथदीप, एखादे पार्क कसे सुरू करता येईल. चौपाटीवर जाण्यासाठी योग्य नैसर्गिक साकव, स्वच्छतागृह कोठे उभारावीत आदीची पाहाणी करण्यात आली. याबाबतचा अंतिम आराखडा तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही ठरवीण्यात आले.
समुद्रचौपाटीची पहाणी करत असताना समुद्रामध्ये मोठया प्रमाणात डाल्फीनचेही दर्शन उपस्थित अधिकाऱ्यांना झाले. त्याचबरोबर चौपाटीवरील असलेली स्वच्छता यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी अधिक समाधान व्यक्त केले. ठिकाण पूर्वीच्या नक्षत्रवन व नाना नानी पार्कबाबत तसेच सीव्ह्यु गॅलरीबाबतचीही माहीती घेतली.
सीव्ह्यु करीता छोटे छोटे मनोरे उभारण्याचाही मानस व्यक्त केला. उपस्थित अधिकाऱ्यांनी गुहागरचे ब्ल्यू फ्लग मानांकनासाठी पोषक असल्याचेही करण्यासाठीचेही नियोजन केले. विविध स्पष्ट केले व लवकरात लवकर काम सुरू तहसिलदार परिक्षीत पाटील व मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी येथील चौपाटीवरील अक्टीव्हीटीबाबतही दिली. एमएमबी विभागालाही वृक्ष माहीती आवश्यक त्या सुचना यावेळी केल्या गेल्या. धोकादायक सुरू काढून त्याठिकाणी शासनमान्य लागवडबाबतही सेवेकरीता वनविभागाजवळ चर्चा केली.
समुद्रचौपाटीवर प्लास्टिक वापराबाबत लवकरच कडक धोरण आखले जाणार असून चौपाटी अधिक स्वच्छ व सुशोभित करण्यासाठीची चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी एमएमबीचे श्री. शिरसागर, कांदळवण अधिकारी, वनपाल अमीत निमकर, भूमी अभिलेखचे अधिकारी, सर्कल आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 13/Jan/2026














