रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनने गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमांतर्गत रत्नागिरी मधील कुष्ठरोग वसाहतीतील कुटुंबियांना किराणा किटचे वाटप केले.
भविष्यातही या वसाहतीला मदत करण्याचे आश्वासन दिले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे २०२० पासून दसरा व दिवाळीच्या काळात गिव्ह विथ डिग्निटी कार्यक्रमांतर्गत गरजूना रेशनकिट पुरवून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून ती परंपरा कायम ठेऊन विकसित करत अनेकांच्या जीवनात आशा आणि प्रकाशाची दिवाळी सन्मानाने साजरी करण्याचे काम मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स ने करत आहे. यावर्षी, रिक्षा चालक, बेघर, अंध आणि दिव्यांग व्यक्ती, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजंदारी मजूर आणि बरेच काही यांसारख्या उपेक्षित गटांसह विविध समुदायांना पुन्हा दिवाळी किट वितरित करत आहोत.फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन ने 10 राज्यांमध्ये दहा हजार किट वितरण करण्याचा संकल्प केला आहे.
कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गावडे, शिरगाव सरपंच सौ. काझी, फिनोलेक्सचे डायरेक्टर चक्रबर्ती व कर्मचारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाला डॉ. आठल्ये यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 28-10-2024














