मिळंद-सावडाव ग्रामपंचायतीतर्फे पिशव्या, कचराकुंड्या वाटप

पावस : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्ती व घनकचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना म्हणून गावातील सर्व कुटुंबांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. तसेच प्राथमिक शाळा मिळंद, प्राथमिक शाळा सावडाव, हायस्कूल मिळंद या शाळांना व गावातील सर्व मंदिरांना कचराकुंड्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी सरपंच कीर्ती आयरे यांनी गावातील प्रत्येक नागरिकांनी कोणतीही गोष्ट अभियानापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवून आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घनकचरा व सांडपाणी यांचे योग्य नियोजन करून प्लास्टिक मुक्ती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, तरच भविष्यात चांगले व सुदृढ जीवन जगता येईल, असे सांगितले.

यावेळी ग्रामसेवक अमृता शिवलकर, उपसरपंच रवींद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य नेहा गुरव, विजया माने, माजी पं. स. सदस्य बाजीराव विश्वासराव, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप आयरे, मिळंद हायस्कूलचे मुख्याध्यापक योगेश आयरे, सावडाव प्रा. शाळा मुख्याध्यापक कोंडुस्कर, मिळंद प्रा. शाळा मुख्याध्यापक चौगले, सामाजिक कार्यकर्ते अंबाजी गुरव, रमाकांत मोरे, संजूव मोरे, रघुनाथ माने आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 13/Jan/2026