कडवई : संकटातूनच माणूस खऱ्याअर्थाने घडतो. जर यश मिळवायचे असेल तर मनाला घडवा आणि भविष्यात उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावरायचे असेल तर शाळेत मिळणाऱ्या संस्कारांची जाणीव सदैव मनात ठेवा, असे आवाहन प्रमुख पाहुणे चंद्रकांत झगडे यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूलच्या १०८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शाळेच्या गुरुदक्षिणा सभागृहात हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष किशोरकुमार साठे होते.
मुख्याध्यापक महादेव परब यांनी प्रास्ताविक केले. महादेव शिंदे यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. या अंकाच्या संपादिका जंगम या आहेत. तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या सरंद इंग्लिश स्कूल व माखजन इंग्लिश स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण शिक्षक संतोष कुलकर्णी व तनया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सहसचिव दीपक शिगवण, मुख्याध्यापिका धनश्री राजे-सावंत उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गणेश शिंदे, तर पाहुण्यांची ओळख ओंकार नामजोशी यांनी करून दिली. शाळेचे पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 13/Jan/2026














