चिपळूण : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा व पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी आयशर बस उभी केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (११ जानेवारी) सकाळी १०:२५ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली.
मंगेश चंद्रकांत गुरव (वय. ३६, रा. पाचाड, चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील आयशर बस मुख्य रस्त्यावर लावली होती. ही बस त्याठिकाणी उभी करून तो निघून गेला होता. याप्रकरणी पोलिस नाईक विशाल धाडवे यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 13/Jan/2026














