Sangameshwar : मुर्शी येथे तिहेरी अपघात; चार जण जखमी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील मुर्शी जवळील गोवरेवाडी फाट्यानजिक तीन वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सिद्दीक अय्याज मुल्ला वय २६ रा कराड हे आपल्या ताब्यातील एम एच ५० एम ५७७७ बोलेरो पीकप गाडी कराड ते रत्नागिरी असा जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने मुर्शी जवळील गोवरेवाडी रोडजवळ इको गाडीला (एम एच ११डी ए 5275) जोरदार धडक दिली व इको गाडी गंगाराम तुकाराम शिंदे वय सु ६२ हे चालवीत असलेल्या रिक्षावर (एम एच ०८ इ ८४३८) जोरदार आदळल्याने रिक्षा पलटी झाली.

त्यामुळे रिक्षातील शाळेतील मुले व अंगणवाडी सेविका व रिक्षाचालक जखमी झाला यामध्ये गंगाराम तुकाराम शिंदे वय ६२ राहणार कोंडगाव, तन्वी राजू कांबळे वय ११, स्वरा सचिन कांबळे वय १२, राहणार दक्खन बौधवाडी, दीपाली दिलीप कनावजे वय ५५राहणार मुर्शी अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांनाप्रथम साखरपा रुग्णालयात व त्यानंतर रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहेअपघाताचे वृत्त समजताच साखरपा दूरक्षेत्राचेसहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरु केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 13/Jan/2026