चिपळूण : गेली दहा वर्षे श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमालेचे माध्यमातून विद्यावाचस्पती आफळेबुवांनी यांनी आपल्याला माहीत नसलेला इतिहास सांगितला आहे. विचारांची सुत्रे दिली आहेत. आपण सर्वांनी बुवांनी दिलेल्या विचारांची सुत्रे घेऊन अभ्यास करावा, मांडलेले विचार ग्रहण करावेत. येत्या पाच दिवसांत पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडताना बुवांनी मांडलेले विचार पुढील मंडळी पर्यंत पोहोचवावेत असं आवाहन प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांनी श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित दशकपूर्ती कीर्तनमालेचे उदघाटक अतिथी म्हणून बोलताना केले.
आफळेबुवां दृष्टी दाखविणारे, तळमळीचे कीर्तनकार आहेत असे धनंजय चितळे यांनी यानिमित्ताने नमूद करताना चिपळूणवासिय रसिकांनी पाच दिवसीय कीर्तनमालेतील बुवांचे अभ्यासपुर्ण व सुश्राव्य सादरीकरणातील पेशवाईचा सुवर्णकाळ ऐकण्यासाठी आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील दशकपूर्ती कीर्तनमालेचे उदघाटन प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे यांच्या समवेत उपस्थित मान्यवर अतिथी म्हणून संगीत संयोजक श्री. कमलेश भडकमकर, श्री स्वामी चैतन्य परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुधाकर बेंडके, उपाध्यक्ष श्री. समीर देवळेकर यांची उपस्थिती होती. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अतिथीं व बुवांसमवेत असलेले साथीदार श्री मिलिंद तायवाडे (तबला), श्री. मनोज भांडवलकर (पखवाज), श्री चिंतामणी निमकर (ऑर्गन), श्री. वज्रांग चारूदत्त आफळे (तालवादक), श्री. वरद केळकर (सहगायक) या कलावंतासमवेत ह.भ.प. श्री. संकेतबुवा भोळे यांचा श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने श्री. शेखर जाधव, श्री. देवेंद्र रेडीज, श्री. हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उदघाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. विजय (नाना) परचुरे यांनी पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार पाच दिवसीय कीर्तनमालेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आयोजक परिवाराचे वतीने आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 13/Jan/2026














