Ratnagiri : दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्रे बंधनकारक; १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरमान्य विशेष शिबिरे

रत्नागिरी : ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे आरोग्य विभागाकडील जुन्या ऑफलाईन हस्तलिखित किंवा प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत, त्यांनी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन काढणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित केली असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजित गाताडे यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करून ते २,५०० रुपये केले आहे. या वाढीव अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर लाभार्थ्याच्या नावासमोर क्रमांक अपलोड असणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय शिबिर तपशील १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालय, १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता गुहागर ग्रामीण रुग्णालय, २० जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता लांजा तहसील कार्यालय, २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता कामथे उपजिल्हा रुग्णालय, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता मंडणगड ग्रामीण रुग्णालय, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता राजापूरजानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालय, १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता गुहागर ग्रामीण रुग्णालय, २० जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता लांजा तहसील कार्यालय, २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता कामथे उपजिल्हा रुग्णालय, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता मंडणगड ग्रामीण रुग्णालय, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता राजापूर ग्रामीण रुग्णालय, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता देवरुख ग्रामीण रुग्णालय येथे शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यात दर बुधवार व शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिबिराचे आयोजन केले आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य अद्याप नाही अशा लाभार्थ्यांनी शिबिराच्या तारखेपूर्वी कागदपत्रासह जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांच्यामार्फत आवश्यक त्या माहीतीसह ऑनलाईन अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक/हितचिंतक यांच्यामार्फत आपल्या तालुक्यातील शिबिराच्या तारखेपूर्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 14/Jan/2026