रत्नागिरी : रेल्वे कॉलनीमधून अज्ञाताने दुचाकी लांबवल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत आसिफ उस्मान पिरनाईक (२१, रा. कालसेकर चाळ, कुंभारवाडी, लांजा) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार आसिफ पिरनाईक यांनी आपली प्लेझर दुचाकी (एमएच-०८-यू-५८४२) रेल्वे कॉलनीमधील भीमा बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या जागेत पार्क करुन ठेवली होती. ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. सुमारास ते गाडी पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला परंतु, त्यांना कोठेही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 14/Jan/2026














