गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी येथील शेतकरी किशोर रामचंद्र पवार यांच्या मालकीच्या असलेल्या गाईवर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार मारल्याने या शेतकऱ्याचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी कळझोंडी गावातून होऊ लागली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कळझोंडी येथील शेतकरी किशोर पवार हे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली पाळीव जनावरे चरवण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने जनावरांवर हल्ला करुन त्यातील एकाचा पाडीचा जीव घेतला. जनावरांचे मालक किशोर पवार हे प्रचंड भयभीत होऊन त्यांनी आपला जीव कसाबसा वाचविला. मात्र गाईवर हल्ला करून ठार मारल्याने या शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस. काळे, वन विभाग रत्नागिरी यांना देण्यात आली. या घटनेमुळे किशोर पवार यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 14/Jan/2026














