Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी होती. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नंतर अनेक भागांत पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी प्रचंड ऊन काही भागांत ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे.
काही दिवसांपासून निचांकी तापमानाच्या नोंदी होत असताना ठाणे, मुंबईसह संभाजीनगरमध्येही नागरिकांना पावसाने गाठलं. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गेल्या काही दिवसात किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. धुळे आणि परभणीसारख्या शहरांमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हा मध्ये तापमान 10° पर्यंत पोहोचल्याने थंडी वाढली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात हवामान कसे राहणार? याविषयी हवामान खात्याने अंदाज दिला आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सक्रियपट्ट्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. दुसरीकडे उत्तरेत पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश घराच्या मध्ये दाट धुक्याची चादर राहणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे. दक्षिण आणि उत्तरेत तयार झालेल्या वेगळ्या हवामान परिस्थितीचा महाराष्ट्रावर झाला आहे.
पुढील 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात लक्षणीय घट होणार असून दोन ते तीन अंशांनी तापमान घटणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचे सांगितलं जातंय. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता फारशी नसली तरी दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कसे राहणार महाराष्ट्रात हवामान?
नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत आर्द्रता कमी राहणारा असून नागरिकांना कोरड्या व थंड हवामानाचा अनुभव येईल. कोकणपट्ट्यातील रायगड ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामानात फारसा फरक जाणवणार नसला तरी कमाल तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील थंडी मकर संक्रांति पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील थंडीची लाट काही ओसरली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. बीड, धाराशिव, जालना, लातूर ,परभणी जिल्ह्यांमध्ये सकाळी धुक्याचं चित्र कायम होतं. किमान तापमानाचा पारा 8 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण आणि उत्तरेकडे घडणाऱ्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी थंडीची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 14-01-2026














