रत्नागिरी : यंदा कोकणासह राज्यभरात पावसाने ५-६ महिने मुक्काम केल्यामुळे रब्बी पेरणीस उशिर झाला. खरीप पीक पूर्णपणे हातातून गेल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीस नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात केली. जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर भागात भुईमूग किरकोळ काही पेरण्या राहिल्या आहेत. भाजीपाल्यांसह कडधान्याची पेरणी मोठ्याप्रमाणात झालेली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पन्न होईल असा अंदाज होता. मात्र सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली, तर ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. एकंदरीत खरीप पिक पूर्णपणे वाया गेले. त्यानंतर नोव्हेंरबर शेवटच्या आठवड्यापासून रब्बी पिकांची तयारी शेतकऱ्यांनी केली. यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात आतापर्यंत ४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कडधान्यांसह भाजीपाल्यांचा समावेश आहे.
या कडधान्य, भाजीपाल्यांची पेरणी
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, मुळा, पडवळ, वाल, दोडके, कारली, भेंडी, दुधी, घोसाळी, तोंडली, दोडक, काकडी या भाजीपाला तर कडधान्या कुळीथ, पावटा, हरभरा, कडवायासह विविध पेरणी झाली आहे.
यंदा रब्बीचा महिना उशिराने सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला वेळ झाला. यंदा ५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उद्दिष्ट आहे. जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खेड, चिपळूण आणि संगमेश्वर येथील काही भागात भुईमूगच्या पेरण्या शिल्लक आहेत. उर्वरित पेरण्या पूर्ण झाल्या आहेत- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 14/Jan/2026














