रत्नागिरी : दिवाळीचे साऱ्यांना वेध लागले असून दिवाळीच्या पूर्व तयारीची धामधूम सुरु झाली आहे. शहरातील कै. ल.ग. पटवर्धन प्राथमिक शाळेत दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, पणत्या तयार करुन त्याचे शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले होते. हस्तकौशल्यातून तयार झालेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील पहाण्यासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याला यातून वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
व्यवहार ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पणत्यांची, आकाश कंदीलांची शाळेत विक्रि करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी वर्गशिक्षक श्री. ऐवळे सर, श्री. मोरे सर, श्री. घाणेकर सर, सौ. नेने मॅडम, सौ. राजेशिर्के मॅडम व सौ. औघडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनाची सर्व तयारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. पटवर्धन मॅडम यांनी केली.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या व आकाशकंदील यांची पालकांनी खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 28-10-2024














