देवरुख : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात रिक्षावाल्यांकडून प्रवाशांकडून निश्चित स्वरूपाचे भाडे घेतले जात नाही. यामुळे रिक्षाचालकांसाठी दरपत्रक आरटीओंनी निश्चित करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
रेल्वे प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर ठिकाणानुसार रिक्षाचे भाडे निर्धारित केलेले फलक लावले आहेत. ही बाब निदर्शनास आणून देताना आरटीओने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात अशाचप्रकारचे दर फलक लावले पाहिजे, जेणेकरून प्रवाशांची पिळवणूक थांबवता येईल. तालुक्यातील इतर ठिकाणच्या रिक्षा चालकांसाठी वेगळे रिक्षा स्टँड हवे, जसे की देवरूख, साखरपा, संगमेश्वर
भागातील रिक्षा सहज उपलब्ध होईल, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 14/Jan/2026














