Dapoli : मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॉक्साइटने भरलेला डंपरचा अपघात

दापोली : दि. १३ जानेवारी रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्खनन केलेल्या बॉक्साइटने भरलेला एक डंपर काल पुन्हा अपघातग्रस्त झाला. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत याच परिसरात असा दुसरा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी रस्ता पूर्णतः मोकळा व सरळ असून सहज डंपर आडवा पडणे शक्य नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र या मार्गावरून सातत्याने ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने ये-जा करत असल्याने वाहनावरील ताबा सुटून असे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणाबाबत कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 14/Jan/2026