Ratnagiri : आदर्श सार्वजनिक स्वच्छता सुविधा केंद्र लोकार्पणाच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : जिल्ह्यातील पहिले आदर्श सार्वजनिक स्वच्छता सुविधा केंद्र रत्नागिरी शहरातील शनिवार आठवडा बाजार येथे उभे राहिले आहे. लवकरच या स्वच्छता सुविधा केंद्राचे लाकार्पण होणार आहे. आठवडा बाजार परिसर हा सदैव गजबजलेला असतो. या ठिकाणी अशा सार्वजनिक स्वच्छता सुविधा केंद्राची नितांत गरज होती.

शनिवार आठवडा बाजार येथील सार्वजनिक स्वच्छता सुविधा केंद्रात तब्बल १९ शौचसीट आहेत. त्याचबरोबर ७ मुताऱ्या, ३ स्नानरूम, अपंगांसाठी टॉयलेट बाथरुम आहेत. इतकेच नव्हे तर मातांना त्यांच्या बाळांना स्तनपान देण्यासाठी स्वतंत्र खोली असून तेथे महिलांच्या सॅनेटरी पॅडचीही व्यवस्था आहे. या केंद्रावर सेवा देणाऱ्या काळजीवाहकाचीही स्वतंत्र खोली आहे.

शनिवार आठवडा बाजारातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या खासगी आराम बस आहेत. आठवडा बाजारासाठी जिल्ह्याबाहेरून व्यापारी येत असतात. या मार्गावर अनेक लहान-मोठी दुकाने आहेत. त्यामुळे स्थानिक ग्राहकांचीही गर्दी असते. या सर्वांना या आदर्श सार्वजनिक सुविधा केंद्राचा फायदा होवू शकणार आहे. या स्वच्छता सुविधा केंद्राचे जवळजवळ संपूर्ण काम पूर्ण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 14/Jan/2026