रत्नागिरी : गोगटे जोगळेकरमध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत कार्यशाळा

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएमउषा) अंतर्गत अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा झाली. ही कार्यशाळा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. सरकारतर्फे अशा कार्यशाळेतून राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीबद्दल विविध आस्थापनांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक अमोल सहस्रबुद्धे यांनी केले. क्षेत्रीय समन्वयक, अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे माजी यूजीसी अधिकारी अभिनव शर्मा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी किंवा शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट याविषयी मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन कडून राबविण्यात येणाऱ्या विविध दीर्घकालीन उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, डीजीलॉकर, एबीसी आयडी आणि एपीएएआर आयडी या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रवेश पोर्टल विषयी मार्गदर्शन केले.

या सर्व माध्यमांद्वारे उच्च शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट संकलित केले जाणार आहेत. भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड प्रमाणेच १२ अंक असणारे युनिक नंबरचे एबीसीडी कार्ड मिळणार आहे. त्यामध्ये क्यूआर कोड असून तो स्कॅन केल्यानंतर विविध विषयात मिळालेले क्रेडिट विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 28/Oct/2024