देवरुख : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले आहेत. देवरुखमध्ये दोन ठिकाणी हा प्रकार घडला. या दोघांनीही देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल होत तत्काळ उपचार घेतले. या घटनेमुळे भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा त्रासदायक आला आहे.
मंगळवारी देवरुख बसस्थानक, माणिक चौक येथे हे प्रकार घडले. अक्षय चव्हाण (रा. लांजा) देवरुख येथून वांझोळे येथे नातेवाईकांकडे जात होते. यावेळी माणिक चौकात कुत्रा त्यांच्या पायाला चावला. दुसऱ्या घटनेत बसस्थानक परिसरात योगेश पडवळ या तरुणाला कुत्रा चावला. दोघांनी तत्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतले. देवरुख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. बाजारपेठेसह शासकीय कार्यालय परिसरातही कायम गर्दी असते. मात्र या सर्व लोकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सातत्याने सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 14/Jan/2026














