रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३७ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन संवर्गाची अनुज्ञप्ती धारकांसाठी (परिवहन लायसन्सधारक) आठ दिवस मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिवहन अनुज्ञप्तीधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. १५ जानेवारी, १९ जानेवारी ते २२ जानेवारी आणि २७ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण ठिकाण, हातखंबा ट्रॅक येथे हे शिबिर होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 14/Jan/2026














