रत्नागिरी शहरात पोलिसांचे पथसंचलन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मारुती मंदिर, लोटलीकर हॉस्पिटल, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर ते साळवी स्टॉप या मार्गावर रत्नागिरी शहर पोलिसांनी शनिवारी पथसंचलन केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले.

त्यामध्ये ३ पोलीस अधिकारी आणि ३० अंमलदार, केंद्रीय राखीव दलाचे १ अधिकारी, ३० अंमलदार आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 28-10-2024