देवरूख : शाळांना सुरू होणाऱ्या सुटीचा कालावधी लक्षात घेता २५ ऑक्टोबरपासून देवरूख-म्हसवड मार्गावर देवरूख आगारामार्फत खास दिवाळी स्पेशल बससेवा सुरू होत आहे. देवरूखहून सकाळी ६ वा. सुरू होणारी बस म्हसवडला दुपारी १२.३० वा. पोहोचेल तर म्हसवडहून दुपारी २ वा. सुटणारी बस देवरूखला रात्री ८.३० वा. परत येईल. ही बस साखरपा, मलकापूर, कोकरूड, कराड, पुसेसावळी, वडूज, दहिवडी आणि गोंदवले या मार्गे धावणार आहे. देवरूखहून सुटलेली बस मलकापूरला ८ वा., कराडला १० वा., गोंदवलेला १२ वा. आणि म्हसवडला १२.३० वा. पोहोचेल. म्हसवडहून सुटलेल्या बसचा प्रवास गोंदवलेला २.३० वा., कराडला ४.३० वा., मलकापूरला ६.३० वा. होत रात्री ८.३० वा. देवरूखला समाप्त होईल. या बससेवेमुळे श्री देवी सोळजाई, श्री देव मार्लेश्वर, श्री देवी यमाई, ब्रह्मचैतन्य महाराज आणि श्री देव सिद्धनाथ यांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसह, माहेरवाशीण, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारीवर्गाला प्रवासाची सोय होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 28/Oct/2024














