Maharashtra Municipal Election 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान

Maharashtra Municipal Election 2026: राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान (Maharashtra Municipal Election 2026) होणार आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे.

राज्यातल्या एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होतेय. तर एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. राज्यात एकूण 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. त्याठिकाणी मतदारांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मतं द्यावी लागणार आहे. त्यांच्या ईव्हीएमवर 4 वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असतील. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरला लागणार आहे. (Maharashtra Municipal Election 2026)

कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार? (Municipal Corporations Election List)

  1. बृहन्मुंबई – एकूण जागा- 227
  2. भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90
  3. नागपूर – एकूण जागा-151
  4. पुणे – एकूण जागा-162
  5. ठाणे – एकूण जागा-131
  6. अहमदनगर – एकूण जागा-68
  7. नाशिक – एकूण जागा-122
  8. पिंपरी-चिंचवड – एकूण जागा-128
  9. औरंगाबाद – एकूण जागा-113
  10. वसई-विरार – एकूण जागा-115
  11. कल्याण-डोंबिवली – एकूण जागा-122
  12. नवी मुंबई – एकूण जागा-111
  13. अकोला – एकूण जागा-80
  14. अमरावती – एकूण जागा-87
  15. लातूर – एकूण जागा-70
  16. नांदेड-वाघाळा – एकूण जागा-81
  17. मीरा-भाईंदर – एकूण जागा-96
  18. उल्हासनगर – एकूण जागा-78
  19. चंद्रपूर – एकूण जागा-66
  20. धुळे – एकूण जागा-74
  21. जळगाव – एकूण जागा-75
  22. मालेगाव – एकूण जागा-84
  23. कोल्हापूर – एकूण जागा-92
  24. सांगली-मिरज-कुपवाड – एकूण जागा-78
  25. सोलापूर – एकूण जागा-113
  26. इचलकरंजी – एकूण जागा-76
  27. जालना – एकूण जागा-65
  28. पनवेल – एकूण जागा-78
  29. परभणी – एकूण जागा-65

Municipal Election Maharashtra Live 2026: कुठे कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?

मुंबई महापालिका
उद्धव ठाकरे – राज ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे
((मशाल-इंजिन विरुद्ध धनुष्यबाण))

मुंबई
उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस
(मशाल विरुद्ध कमळ))

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे – राज ठाकरे
((धनुष्यबाण विरुद्ध मशाल-इंजिन))

गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे
((भाजप विरुद्ध धनुष्यबाण))

कल्याण-डोंबिवली
रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे
((भाजप विरुद्ध धनुष्यबाण))

पुणे
अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ
((राष्ट्रवादी घड्याळ विरुद्ध भाजप))

पिंपरी-चिंचवड
अजित पवार विरुद्ध महेश लांडगे
((राष्ट्रवादी घड्याळ विरुद्ध भाजप))

गिरीश महाजन विरुद्ध राज ठाकरे-उद्धव ठाकरे
((भाजप विरुद्ध मशाल-इंजिन))

सतेज पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील
((काँग्रेस विरुद्ध भाजप))

छ. संभाजीनगर
संजय शिरसाट विरुद्ध अतुल सावे
((धनुष्यबाण विरुद्ध भाजप))

देवेंद्र फडणवीस – भाजप
विकास ठाकरे – काँग्रेस

मिरा-भाईंदर
नरेंद्र मेहता – भाजप
प्रताप सरनाईक – शिवसेना शिंदे

सुधीर मुनगंटीवार – भाजप
विजय वडेट्टीवार – काँग्रेस

रणधीर सावरकर – भाजप
प्रकाश आंबेडकर – वंचित

अहिल्यानगर
राधाकृष्ण विखे-पाटील – भाजप
निलेश लंके – राष्ट्रवादी (शप)

अनिल बोंडे – भाजप
यशोमती ठाकूर – काँग्रेस

जयकुमार गोरे – भाजप
प्रणिती शिंदे – काँग्रेस

अमित देशमुख – काँग्रेस
संभाजी पाटील-निलंगेकर – भाजप

चंद्रकांत पाटील – भाजप
जयंत पाटील – राष्ट्रवादी (शप)

गिरीश महाजन – भाजप
एकनाथ खडसे – मविआ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 15-01-2026