दाभोळे-कनकाडी रस्ता पुन्हा उखडला

साखरपा : दाभोळे कनकाडी रस्त्याची दुरवस्था होण्याचे जी प्रकार सुरूच आहेत. तात्पुरती डागडुजी केलेला रस्ता पुन्हा पुन्हा उखडला जात आहे. सातत्याने होत असलेली डंपर वाहतूक या रस्त्याच्या दुरवस्थेस कारणीभूत ठरत आहे.

दाभोळे-कनकाडी हा चार किमीचा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक झाला आहे. दाभोळे गावापासून ते कनकाडी येथील गराटेवाडी नजीक उभारण्यात आलेल्या खडी क्रशर दरम्यानच्या चार किमीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून क्रशरवरील खडी वाहतूक करण्यासाठी डंपर वाहतूक सातत्याने सुरू असते. दिवसभर सुरू असलेल्या वाहतुकीमुळे हा रस्ता जागोजागी उखडला गेला आहे. रस्त्याला ठिकठिकाणी चर पडले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 28/Oct/2024