Chiplun : सिंगासनाकडे करंजेश्वरी देवी जाणारा रस्ता लवकरच मार्गी लागणार

चिपळूण : शहरातील श्रीदेवी करंजेश्वरी ज्या ठिकाणी प्रकट झाली, त्या सिंगासन स्थळाकडे जाणारा रस्ता लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली. नगरसेवक, अधिकाऱ्यांसह या रस्त्याची पाहणी नगराध्यक्षांनी केली. या पाहणीनंतर आठ दिवसांच्या आत लगतच्या जमीनदारांची बैठक घेणार असून या बैठकीत ६ मीटर, १२ मीटर की १५ मीटर रस्ता करायचा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक प्रमोद बुरटे, उदय जुवळे, विकी लवेकर, प्रल्हाद तांबट, करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर, साईनाथ कपडेकर, विनय रेडीज, सिद्धेश रेडीज, वसंत बुरटे, गणेश खातू, अक्षय बामणे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 15/Jan/2026