रत्नागिरी : डिसेंबर २०२५ अखेरच्या संपणाऱ्या तिमाहीची विवरण पत्र ई-आर १ मधील माहिती सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व तिमाही विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय कायदा १९५९ व नियम १९६०५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस युझर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने सादर करून सहकार्य करावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 15/Jan/2026












