Ratnagiri : भगवती नगर येथे मालगुंड विद्यालयाने बांधला वनराई बंधारा

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमधील एन. सी. सी. विभागातील विद्यार्थी व सामाजिक वनीकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवती नगर येथे वनराई बंधारा बांधला. एन.सी.सी. व अन्य विद्यार्थ्यांना घेऊन एन. सी. सी. विभागाचे प्रमुख उमेश केळकर, प्रशालेतील हरित सेना विभागाचे प्रमुख बाबासो बेडक्याळे, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमुख सावर्डेकर व अनिल दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा बंधारा बांधला.

विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटावे यासाठी सदर बंधारा बांधून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. हल्ली नदींमध्ये पाणी कमी झाले आहे. पुढील काही महिन्यांसाठी पाणी व्यवस्थित टिकावे व परिसरातील ग्रामस्थांना व जनावरांना त्याचा फायदा व्हावा, या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 15/Jan/2026