रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची वार्षिक सभा मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात झाली.
यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. चालू वर्षी कोणताही नवीन तंटा समितीकडे प्राप्त नाही, अशी माहिती निमंत्रक पोलिस पाटील वीणा पटवर्धन यांनी दिली. समितीने असेच सहकार्य करावे, असे आवाहन तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप भडकमकर यांनी केले. बैठकीला प्रशासक पवार, सदस्य सचिन पिलणकर, प्रकाश जाधव, दीपक भडकमकर, मिलिंद जाधव उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 15-01-2026














