रत्नागिरी: लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन; कुणबी समाजोन्नती संघाचा स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी | प्रतिनिधी: कोकणातील सहकार आणि समाजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, लोकनेते शामरावजी पेजे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी) यांच्या वतीने शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी हे कार्यक्रम पार पडणार आहेत.

या सोहळ्यामध्ये नवीन कार्यालयाचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचा समावेश असल्याने समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा: कुणबी समाजोन्नती संघाने या दिवशी सकाळी १०:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सकाळी १०.३० वा: लोकनेते शामरावजी पेजे साहेब यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल.

सकाळी १०.३० वा: लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती वाटप आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल.

सकाळी ११.०० वा: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई – ग्रामीण शाखा रत्नागिरी तालुका कार्यालयाचे उद्घाटन संपन्न होईल.

दुपारी १२.०० वा: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संचालित कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४.०० वा: कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी तालुका महिला मंडळातर्फे ‘हळदीकुंकू समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ६.३० वा: मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जातील.

उपस्थित राहण्याचे आवाहन : हा संपूर्ण सोहळा कुणबी भवन, रम्य नगर, जे. के. फाईल्स जवळ, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी समाज बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्री. रामभाऊ गराटे, युवा अध्यक्ष ॲड. सागर शिवाजी कळंबटे आणि महिला अध्यक्षा श्रीम. विनया विनायक गावडे यांनी केले आहे.

लोकनेते शामरावजी पेजे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजातील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 15-01-2026