Lanja : मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लांजा शहरात करण्यात आली आहे. तेथील एका बारच्या बाहेरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात बेनी येथील संदेश शितप आणि शिरवली जानस्करवाडी येथील संतोष राजापकर अशा दोन व्यक्तींवर मंगळवार १३ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये कॉन्स्टेबल किशोर पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 15/Jan/2026